कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात 10 वी परीक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
By मुरलीधर भवार | Published: March 1, 2024 04:23 PM2024-03-01T16:23:38+5:302024-03-01T16:24:05+5:30
दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात
कल्याण - दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बोर्ड परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण हे दडपण कमी व्हावे यासाठी कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयाने परीक्षेच्या पहिल्या दिवशी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहात टाळ्यांच्या आवाजात शिक्षकांनी गुलाब पुष्प देत स्वागत केले.
दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात. ऐन परीक्षेच्या वेळात मनात भीती असल्याने त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी. तणाव मुक्त पेपर लिहावा म्हणून गुलाब पुष्प देत स्वागत करत वातावरण निर्मिती केली. असे अनपेक्षित पणे झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तसेच पेपर संपल्यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थी म्हणाले आमचा पहिलाच पेपर अतिशय चांगला सोडवल्याची उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया शिक्षकांकडे व्यक्त केली. हा उपक्रम मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, सुजाता नलावडे , गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, संगीता महाजन, नयना वाबळे, माधुरी काळे, उर्मिला साबळे, शोभा देशमुख ,रामदास बोराडे, संतोष कदम, विद्या कांबळे, गणेश पालांडे व सचिन धनविजय आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.