सापाचा भिवंडी ते कल्याण बस प्रवास; चालक,वाहकासह प्रवासी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:06 PM2021-07-27T18:06:14+5:302021-07-27T18:10:01+5:30
सर्प मित्राच्या मदतीने पकडले सापाला
कल्याण- शहापूर बस डेपोतून राज्य परिवहन महामंडळाची बस कल्याणच्या दिशने निघाली असता चालकाच्या केबीनमध्ये साप आढळून आल्याने चालकसह वाहक आणि प्रवासी भयभीत झाल्याची घटना आज घडली. बस कल्याण डेपोत येताच सर्प मित्राच्या मदतीने सापाला पकडून जंगलात सोडून देण्यात आले आहे.
शहापूर ते कल्याण ही बस भिवंडी मार्गे येते. बस कुठे तरी रात्री उभी असताना रात्रीच्या वेळी साप बसमध्ये आश्रयाला आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस शहापूर डेपोतून निघाली. बसवर राहूल कलाने नावाचे चालक होते. बसने शहापूर ते भिवंडीर्पयतचा पल्ला निर्धोकपणो गाठला. बस भिवंडी डेपोत आली.
बसमध्ये आधी काही प्रवासी होते. त्यानंतर आणखीन प्रवासी चढले. मात्र बसने भिवंडी सोडतात. चालक कलाने यांच्या केबीनमध्ये साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब वाहकास सांगितली. त्यावेळी वाहकाने प्रवाशांनाही सूचीत केले की, घाबरुन जाऊ नका. बसमध्ये साप आला आहे. साप आला असल्याचे म्हटल्यावर कोणाचाही भांबेरी उडणार. मात्र चालकासह वाहकाने कल्याण बस डेपोत संपर्क साधला.
कल्याण बस डेपोचे व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सर्प मित्र दत्ता बोंबे यांना संपर्क साधला. दत्ता बोंबे यांनी कोणीही घाबरु नका. गाडी थेट कल्याण डेपोत आणा. गाडी येण्यापूर्वीच बोंबे बस डेपोत पोहचले. त्याठिकाणी गाडीतला साप गाडीतील पत्रच्या कोनाडय़ात जाऊन बसला होता. कार्यशाळेतील वेल्डरने गाडीचा पत्र कापून त्याठिकाणी लपलेला साप सर्प मित्रास दाखविला असता बोंबे यांनी त्याला पकडले. पकडलेला साप हा बिनविषारी टस्कर जातीचा होता. त्याला जंगलात सोडून देण्यात आले आहे.