गुंतवणुकदारांचे दागिने, भिशीचे पैसे लाटणारा भामटा सराफ अखेर गजाआड

By प्रशांत माने | Published: May 19, 2023 02:19 PM2023-05-19T14:19:55+5:302023-05-19T14:20:23+5:30

ठाकूर्ली रेल्वे स्टेशन समोर सोहनसिंहचे महालक्ष्मी ज्वेलर्स नामक दुकान होते.

Saraf, who used to sell investors' jewels and money, is arrest | गुंतवणुकदारांचे दागिने, भिशीचे पैसे लाटणारा भामटा सराफ अखेर गजाआड

गुंतवणुकदारांचे दागिने, भिशीचे पैसे लाटणारा भामटा सराफ अखेर गजाआड

googlenewsNext

डोंबिवली: सर्वसामान्य नागरीकांकडून भिशीच्या नावाने पैसे आणि गहाण ठेवलेले व बनविण्यासाठी दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या सोहनसिंह चैनसिंह दसाना (वय ५२) या भामटया सोनाराला रामनगर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे सहा महिन्यापासून सोहनसिंह आपल्या घरातील एका रुममध्ये बाहेरुन टाळे ठोकत लपून राहत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाकूर्ली रेल्वे स्टेशन समोर सोहनसिंहचे महालक्ष्मी ज्वेलर्स नामक दुकान होते.

नागरीकांकडून विश्वासाने दागिने घेवून त्या मोबदल्यात कर्ज देतो असे सांगत, तसेच दागिने बनविण्यासाठी आगावू रकमा घेवून, कोणतेही दागिने बनवून न देता घेतलेली रक्कम तसेच दागिने घेवून सहा महिन्यांपूर्वी सोहनसिंह पसार झाला होता. त्याने भिशीच्या माध्यमातूनही मोठया प्रमाणात दागिने आणि पैसे ही नागरीकांकडून घेतले होते. अचानक त्याच्या ज्वेलर्स दुकानाला टाळे असल्याचे दिसून आले. जेव्हा गुंतवणूकदारांनी सोहनसिंहला फोन करण्यास सुरुवात केली असता सातत्याने त्याचा फाेन बंद असल्याचे आढळून आले.

आजुबाजुला चौकशीअंती अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित १६ गुंतवणुकदारांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत सोहनसिंह विरोधात तक्रार दिली होती. गुंतवणुकदारांची एकुण ३१ लाख ५३ हजार २२० (रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने ) रूपयांची फसवणूक झाली होती. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे ) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, निलेश पाटील, निसार पिंजारी यांचे पथक नेमले होते.

पत्नीने दिली खोटी माहीती

पोलिसांचे पथक तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थान येथील थुरावड बरकडा की भागल या गावात पोहचले. सोहनसिंहच्या घराचा ठावठिकाणा शोधत पोलिस त्याच्या घरीही पोहोचले. पण सहा महिन्यांपासून ते आमच्या संपर्कात नाहीत अशी खोटी माहीती सोहनसिंहच्या पत्नीने पोलिसांना दिली. परंतू पोलिसांना सोहनसिंग हा घरातच असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली होती. तो घरातील एका खोलीला बाहेरुन कुलुप लावून आतमध्ये लपून राहतो असेही समजले होते. अखेर पोलिसांनी घरात घुसून कुलुपू तोडत त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Saraf, who used to sell investors' jewels and money, is arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.