Child Marriage: ...तर सरपंचपद धोक्यात येणार; महिला आयोगाची राज्य सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:39 PM2021-12-05T17:39:24+5:302021-12-05T17:40:17+5:30

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. बाल विवाहासंदर्भात राज्य सरकारला महिला आयोगाची शिफारस.

Sarpanch post in problem; Rupali Chakankar Recommendation to the State Government on Child Marriage | Child Marriage: ...तर सरपंचपद धोक्यात येणार; महिला आयोगाची राज्य सरकारला शिफारस

Child Marriage: ...तर सरपंचपद धोक्यात येणार; महिला आयोगाची राज्य सरकारला शिफारस

googlenewsNext

कल्याण: बाल विवाह करुन देणारे आणि घेणारे आईवडील, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात होता. आत्ता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बाल विवाह केला जाईल, त्या सरपंचासह नोंदणी करणा:या रजिस्टारच्या विरोधातही गुन्हा दाखल करुन सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. 

कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका:यांची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माया कटारीया, रेखा सोनावणो आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांनी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणो ग्रामीण परिसराती सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याच्या तक्रारी मांडल्या. यावेळी अध्यक्षा चाकणकर यांनी या रुग्णालयात सरप्राईज व्हीझीट केली जाईल. तसेच त्यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सांगून सोयी सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासीत केले. महिलांच्या सुरक्षीतेसाठीचे शक्ती विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. राज्यातील पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना सूचना करण्यात आली आहे की, शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागात 112 हा हेल्पलाईन नंबर महिलांसाठी सुरु करण्यात आला आहे. महिलांना कोणताही त्रस असल्यास महिलांनी या नंबरवर साधवा. दहा ते पंधरा मिनिटात पोलिस त्यांच्या मदतीसाठी पोहतील.

ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आल्याने महापालिकेने नागरीकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. मात्र चाकणकर यांच्या कार्यक्रमात काही महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता. तसेच सोशल डिस्टसींगचा फज्जा उडाला होता. 
याविषयी चाकणकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काही जणांच्या तोंडावर मास्क नसल्याचे मान्य केले. मात्र मास्क वापराच्या कडक सूचना देऊ असे सांगितले.

Web Title: Sarpanch post in problem; Rupali Chakankar Recommendation to the State Government on Child Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.