सावरकरांना अभिप्रेत राष्ट्रप्रेमी समाज रचना करण्यास प्रामाणिक प्रयत्नांची गरज - विवेक पंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 03:42 PM2024-02-26T15:42:14+5:302024-02-26T15:43:37+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विद्यानिकेतन शाळेची आदरांजली. सावरकर, डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या पुण्यतिथीला महानगरपालिकेतर्फे आदरांजली

Savarkar needed sincere efforts to create a nation-loving society: Vivek Pandit | सावरकरांना अभिप्रेत राष्ट्रप्रेमी समाज रचना करण्यास प्रामाणिक प्रयत्नांची गरज - विवेक पंडित

सावरकरांना अभिप्रेत राष्ट्रप्रेमी समाज रचना करण्यास प्रामाणिक प्रयत्नांची गरज - विवेक पंडित

डोंबिवली - स्वर्गीय स्वा. वि. दा. सावरकरांचे नुसते पुण्यस्मरण न करता, त्यांना अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्रप्रेमी समाज रचना करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केले. डोंबिवलीत त्यांच्या शाळेमध्ये स्वा.सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी आदरांजली वाहिली. 

शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सावरकरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. विद्यार्थी शाळेत आल्यावर प्रथम दर्शन घेऊन पुढे जाईल अशी त्याची रचना करण्यात आली होती.त्यावेळी शाळेत , अतुल पंडित, मुख्याध्यापक गौरी पंडित यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे देखील स्वातंत्र्यवीर सावरकर" व डॉ.आनंदीबाई जोशी" यांच्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण येथे महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस आणि महापालिका सभागृहातील सावरकर यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी उपायुक्त अर्चना दिवे, स्वाती देशपांडे, अतुल पाटील,वैद्यकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील, संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उपसचिव किशोर शेळके, सहा.आयुक्त स्नेहा करपे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आदिनीही प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Web Title: Savarkar needed sincere efforts to create a nation-loving society: Vivek Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.