कोरोना काळातही केडीएमसीहद्दीत भरवली जातेय शाळा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:40 PM2021-03-27T20:40:32+5:302021-03-27T20:41:29+5:30
Corona Virus : कोरोनाच वाढता उद्रेक पाहता शहरातील सर्व शाळा बंद असून ऑनलाईनच्या माध्यमातूनच अभ्यास व परीक्षा घेतल्या जात आहेत.
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या मांडा टिटवाळा परिसरात कोरोना काळातही शाळा भरवली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.
गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून परीसरातील शाळा देखील बंद आहेत. असे असताना टिटवाळा परिसरात एक खाजगी शाळा सुरू असून विद्यार्थ्यांची परीक्षा देखील सुरू असल्याचे दिसून येते.
कोरोनाच वाढता उद्रेक पाहता शहरातील सर्व शाळा बंद असून ऑनलाईनच्या माध्यमातूनच अभ्यास व परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र टिटवाळा परिसरात खाजगी शाळा भरवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. टिटवाळयातील शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी संबंधित शाळा प्रशासनावर टीका केली आहे.
शाळेत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते हे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासन यावर काय कारवाई करते ते पाहावे लागेल.