कल्याण डोंबिवलीत अनेक दुकानं सील; केडीएमसीची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 08:37 PM2021-04-06T20:37:24+5:302021-04-06T20:37:43+5:30
ब प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 06 दुकाने सील करण्यात आली.
कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी आपापल्या प्रभागात पाहणी केली असता अनेक दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशी सर्व दुकानं सील करत धडक कारवाई केली आहे.
ब प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 06 दुकाने सील करण्यात आली. क प्रभागात 2 मॅरेज लॉन्स 30 एप्रिल पर्यंत सील करण्यात आली. फ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलरचे दुकान अशी 2 दुकाने तसेच 90 फुटी रोडवरील 3 दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ग प्रभागात सत्यम सोशल क्लब व 2 दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ई प्रभागक्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच 2 वाईन शॉप सील केली.