डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

By मुरलीधर भवार | Published: May 31, 2024 02:05 PM2024-05-31T14:05:12+5:302024-05-31T14:05:41+5:30

एका बारमध्ये २५ वर्षाखालील तरुण तरुणी दारु पीत असल्याचे आढळून आहे.

seals four bars in dombivli | डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

मुरलीधर भवार, डोंबिवली-पुण्यात झालेल्या हीट अँड रन केसच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. डोंबिवलीतील चार बारला सील ठोकले आहे. त्यापैकी एका बारमध्ये २५ वर्षाखालील तरुण तरुणी दारु पीत असल्याचे आढळून आहे.

पुण्यात एका बिल्डरच्या मुलाने एका तरुण तरुणीला भरधाव महागड्या कारने उडविले. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. हा तरुण अल्पवयीन होता. त्याने मद्यप्राशन केले होते. हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. त्यानंतर अल्पवयीन तरुणांच्या मद्यप्राशनाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाने चार बार सील केले आहे. सील केलेल्या बारमध्ये इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड , गिरीश रेस्टॉरंट अँड बार, मयूर रेस्टॉरंट अँड बार आणि साई सिद्धी रेस्टॉरंट अँड बार यांचा समावेश आहे.

गिरीश रेस्टॉरंट अँड बार मध्ये २५ वर्षाखालील तरुण-तरुणी दारू पीत असताना आढळून आल्याने या बारवर कारवाई करण्यात आली आहे. इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड बारमध्ये लेडिज वेळ संपल्यावरही सुरु होती.

मयूर आणि साई सिद्धी बार रेस्टॉरंट या बार मालकांनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याने आढळून आले. डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी किरण सिंग पाटील यांनी ही कारवाई केली आहे. पुण्यच्या घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. मयूर आणि साई सिद्धी बारच्या मधोमध एक दारु विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानावर माईल्ड बिअर आणि ब्रीझर २१ वर्षापेक्षा जास्त असलेल्या तरुण तरुणीला दिली जाईल. तर स्ट्रॉंग लिकर २५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या तरुण तरुणींना विकत दिले जाईल अशी नाेटिस लावण्यात आली आहे.

Web Title: seals four bars in dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.