मराठी साहित्याची समीक्षा खुजी; ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 08:51 AM2022-03-07T08:51:09+5:302022-03-07T08:51:20+5:30
डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : साहित्याची समीक्षा करण्यासाठी मराठी वाङ्मय अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे वाङ्मय अभ्यास कोणी करीत नाही. त्यामुळे मराठी विकसित झालेली नाही. परिणामी मराठी साहित्याची समीक्षा खुजी आणि दुबळी आहे, अशी खंत मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते.
डॉ. रसाळ यांनी सांगितले की, समीक्षा या प्रकाराकडे लक्ष दिले जात नाही. साहित्याच्या झाडावर बांडगूळ उगवते त्या दृष्टीने समीक्षकाकडे लेखक पाहतात. मराठी साहित्य वाचले जात नसल्याने साहित्याची समीक्षा कोण वाचणार, असा प्रश्न आहे. मराठी साहित्यात समीक्षकांची वानवा आहे. मराठी साहित्याची समीक्षा ही पाश्चात्यांच्या समीक्षेवर अवलंबून राहिली आहे. आपल्या समीक्षकांनी परंपरेशी जोडून घेऊन ती केलेली नाही. मध्ययुगीन समीक्षक नवे लिहणाऱ्याचे काही वाचत नाहीत. नवे लिहिणारे मध्ययुगीन साहित्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या साहित्याची समीक्षा योग्य प्रकारे झालेली नाही. आपल्याकडे दीडशे वर्षांच्या कार्यकाळात मराठीतील एकही ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरित झालेला नाही, याकडे लक्ष वेधले.
‘आपला समाज आधुनिक कधी होणार’?
nनंदी दूध पितो अशी बातमी आज वर्तमानपत्रांतून वाचली. अशा प्रकारची बातमी देणे हेच मुळात चुकीचे आहे.
nनंदी दूध पितो यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. एकवेळ परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या पातळीवर श्रद्धा असणे हे असू शकते. समीक्षक म्हणून माझी स्वतंत्र भूमिका असू शकत नाही.
nएक विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे या सगळ्यांमधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळते.
nआपल्या समाजाचे आधुनिकीकरण कधी होणार असा सवाल ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी विचारला. जेव्हा विचारवंताचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील तेव्हा या गोष्टी दूर होतील.