"रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा"

By अनिकेत घमंडी | Published: October 13, 2022 12:12 PM2022-10-13T12:12:06+5:302022-10-13T12:13:12+5:30

खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक प्रकरण गुन्हे दाखल करून नोकरीतून कायमचे बडतर्फ करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी

"Seize property of builders and municipal officials in RERA scam", MLA Raju Patil | "रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा"

"रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा"

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६७ विकासकांनी खोटे व बनावट कागदपत्र बनवून महारेरासह सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सगळ्याला जबाबदार व्यक्तींसह ज्या महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे घडले त्या सर्व अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करून त्या सगळ्यांची संपत्ती जप्त करून कायम बडतर्फ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. 

महानगरपालिका हद्दीमध्ये बेसुमार, बेकायदा बांधकामे राजरोसपणे सुरु होती. काही बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रोज महापालिकेकडून उपलब्ध होत होती. ज्या बांधकामांवर कारवाई करण्यात येत होती, तो केवळ फार्स होता का असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. आतापर्यंतच्या माहितीनुसार महापालिकेमधील सर्व मालमत्तांची कागदपत्रे महापालिकेकडे गोपनीय विभागात असतात, असे असतानाही मनपा अधिकाऱ्यांनी विकासकांशी आर्थिक संगनमत करुन जाणिवपूर्वक डोळेझाक केली व बांधकामांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच हा महाघोटाळा झाला असून ग्राहकांसह महारेराचीही फसवणूक झाली आहे. 

विकासक व अधिकारी यांच्या साठमारीमध्ये ग्राहक भरडले गेले आहेत. त्यामुळे या घोटाळ्याला विकासक जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त महानगरपालिका अधिकारी असून याबाबत कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.कारण विकासक, महानगरपालिका अधिकारी यांनी संगनमताने संघटीत गुन्हा केला आहे. तरी गृहमंत्री फडणवीस यांनी या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये विकासकांसोबतच तत्कालीन प्रभाग क्षेत्र अधिकारी, अतिक्रमण, नगर रचना विभागासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करून चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, यापुढे असे कोणी करणार नाही यासाठी कठोर कारवाई करावी असे पाटील म्हणाले. 

लोकमतच्या हॅलो ठाणे कल्याण डोंबिवली या पुरवणीमधील सोमवारी प्रसिद्ध झालेल्या रेराची फसवणूक करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना तुरुंगात टाका या वृत्तासह बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट या मथळ्याखालील वृत्तांचे आमदार पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांना संदर्भ जोडले असून त्यात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कठोर पावले उचलणे अपेक्षित असल्याचे पाटील म्हणाले.

Web Title: "Seize property of builders and municipal officials in RERA scam", MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.