"त्या" व्हायरल व्हिडिओवरून कल्याण-डोंबिवलीत सेना-भाजप आमनेसामने 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 07:57 PM2021-08-20T19:57:31+5:302021-08-20T19:58:51+5:30

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये आशिष चौधरी नावाच्या एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन हॅक करून गायकवाड यांना निवडूण आणल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हायरल व्हिडिओ स्टिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sena-BJP clash in Kalyan-Dombivali from a viral video | "त्या" व्हायरल व्हिडिओवरून कल्याण-डोंबिवलीत सेना-भाजप आमनेसामने 

"त्या" व्हायरल व्हिडिओवरून कल्याण-डोंबिवलीत सेना-भाजप आमनेसामने 

Next

कल्याण- एकीकडे वरिष्ठ पातळीवर भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेवरून  सेना- भाजपमध्ये  राजकीय टीका सुरू असताना आता कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर सेना-भाजप आमनेसामने आले आहेत. ईव्हीएम हॅक करून भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड  यांना निवडून आणल्याचा दावा आशिष चौधरी याने केला होता. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल  झाला आहे. त्यानंतर गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि त्यानुसार गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. आता या सर्व प्रकरणात सेनेने उडी घेतली आहे.  व्हायरल व्हिडिओची चौकशी करून याप्रकरणी गायकवाड यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची मागणी आज शिवसेनेने केली आहे. त्यामुळे शहरात  निवडणुकीच्या तोंडावर आता सेना भाजपमधील कटुता वाढायला सुरवात झाली असल्याचे दिसून येते. 

2019 साली  कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसनेच्या धनंजय बोडारे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत बोडारे यांचा पराभव झाला होता. दरम्यान, दोन वर्षे झाल्यानंतर अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये आशिष चौधरी नावाच्या एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन हॅक करून गायकवाड यांना निवडूण आणल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हायरल व्हिडिओ स्टिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वीच याच स्टिंगमधील आशिष चौधरी याने  गायकवाड यांच्या मुलाची 40 लाखाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते. चौधरी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायकवाड यांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार करून चौकशीची मागणी केली. आता शिवसेनेनेसुद्धा भाजपला लक्ष करत या प्रकाराची उल्हासनगरच्या  सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर शुक्रवारी कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त  विवेक पानसरे यांची भेट घेत सेनेने आमदार गायकवाड, मुलगा वैभव, आशिष चौधरी आणि अन्य दोघांविरोधात  तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दोन्हीही वजनदार पक्षांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहावे लागेल. 

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मी स्वतःहून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. हे सर्व मला बदनाम करण्याचे षडयंत्र असून मी निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे, असे आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे.

Web Title: Sena-BJP clash in Kalyan-Dombivali from a viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.