ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी

By अनिकेत घमंडी | Published: February 26, 2024 01:18 PM2024-02-26T13:18:18+5:302024-02-26T13:19:08+5:30

रोटरी क्लब ऑफ सनसिटीचा वार्षिक अहवाल आढावा कार्यक्रम संस्थेने रोटरिचा सिनियर सिटीझन क्लब काढावा

Senior citizens are the backbone of our tradition, culture: Milind Kulkarni | ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी

ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी

डोंबिवली - घराघरात ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा, त्यांचे अनुभव ऐका, त्यांची विचारपूस करा, खऱ्या अर्थाने तेच आपल्या भारतीय संस्कृती, परंपरेचा कणा आहेत. रोटरी क्लब ऑफ सनसिटी यांनी वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यातील सर्वात मोठा जाहीर कार्यक्रम करून ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त केला आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन रोटरीचे जिल्हाध्यक्ष ( डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) मिलींद कुलकर्णी यांनीकेले. त्या संस्थेने वर्षभरात काय काम केले याचा लेखाजोखा, पाहणी अहवाल आढावा घेण्यासाठी कुलकर्णी डोंबिवलीत आले होते.

नागरिकांना आनंद देण्यासाठी या संस्थेने कार्य केले. जीवनाच्या उतारवयात दुर्लक्षित झालेली पिढी असं ज्येष्ठांकडे न पाहता ते आधारस्तंभ आहेत यादृष्टीने त्यांच्याकडे बघावे असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. सनसिटी ने ज्येष्ठ नागरिकांचा सीनियर सिटीजन क्लब काढावा असे कुलकर्णी यांनी सुचवले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अलंकार तायशेटे यांनी त्यांच्या।क्लबला खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम, उपक्रम राबवून।झळाळी दिली, त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. अलंकार यांनी वर्षभरात त्यांच्या संस्थेने मृत्यूपत्र का काढावे,त्याची गरज काय याबाबत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा कार्यक्रम घेतला. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः दहावीसाठी मार्गदर्शक ऍपच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास याकडे भर दिला. त्याद्वारे ६५० गरजू विद्यार्थ्यांना ऍप विनामूल्य दिले. तसेच गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी मॅथस सर्कल।ही संकल्पना राबवून शेकडो विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण।केली, त्याचा लाभ अनेकांनी घेतला. आता शहापूर, वासींद जवळ एका वनवासी पाड्यात झेडपी अंतर्गत एका शाळेच्या सुमारे ३५ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेण्यासंदर्भात नियोजन, कार्यवाही, अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती दिली. अशा रीतीने नानाविध उपक्रम राबवून आबालवृद्ध नागरिकांना रोटरीची वेगळी ओळख करून दिल्याचे तायशेटे यांनी स्पष्ट केले. त्यावेळी क्लब सचिव उमेश बारस्कर, खजिनदार परेश जोशी, आर्किटेक सलील।जोशी, व्यावसायिक सुभाष पाटील, आर्किटेक अर्चना तायशेटे आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Senior citizens are the backbone of our tradition, culture: Milind Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.