बोईसर ग्रामीण उपविभागात महावितरणकडून सेवा पंधरवाडा
By अनिकेत घमंडी | Published: September 28, 2022 05:51 PM2022-09-28T17:51:37+5:302022-09-28T17:52:06+5:30
या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातील १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली.
डोंबिवली : महावितरणच्या बोईसर ग्रामीण उपविभागात सेवा पंधरवाड्यानिमित्त ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आयोजित शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात नावात बदल करण्यासंदर्भातील १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. तर सेवा पंधरवाड्याच्या कालावधीत आतापर्यंत सिंगल फेजच्या २९९ व थ्री फेजच्या १४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आल्याचे बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले. बोईसर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू तसेच उपव्यवस्थापक उमेश सर्वदे यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात वीज बिलावरील नावात बदलांच्या १७ अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. तर गेल्या आठवडाभरात ३१३ जणांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. सेवा पंधरवाड्यानिमित्त महावितरणच्या विविध कार्यालयांकडून ग्राहकांच्या प्रलंबित अर्जांवर कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे.