उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात
By मुरलीधर भवार | Published: January 10, 2023 06:13 PM2023-01-10T18:13:11+5:302023-01-10T18:13:30+5:30
उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे.
कल्याण-उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर फेसाचा तवंग साचला आहे. याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीने लक्ष वेधले आहे.
म्हारळमधून वाहत येणारा नाल्याचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदी पात्रत सोडले जात आहे. हा नाला नदी पात्रत मिळसतो. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषित पाणी ज्याठिकाणी पाणी पंपिंग केले जाते. त्याठिकाणी जाऊन मिसळते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे उल्हास नदी बचाव कृती समितीचे प्रमुख रविंद्र लिंगायत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी या प्रदूषणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रदूषणाचा व्हीडीओच त्यांनी सोशल मिडियावर टाकला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरीकांना त्वचारोग आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर नदीतील मासे आणि जैवविविधता धोक्यात आली आहे.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी समितीच्या वतीने विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारी यंत्रणा गाढ झोपेत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी अनेकवेळा नदी पात्रत उपोषण केले आहे. त्यानंतर नदी पात्रतील जलपर्णी दूर करण्यासाठी हर्बल फवारणी केली गेली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २४ लाख रुपये खर्च केले गेले. त्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. नदी मिसळणारे नाले वळविण्याकरीता महापालिकेने मास्टर प्लान तयार केला होता. मे २०२२ पर्यंत नदीचे प्रदूषण रोखले जाईल असा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेने केला होता. तो दावा फोल ठरला असल्याचे लिंगायत यांनी सांगितले.
इतकेच नाही तर प्रदूषणावर गॅबीयन बंधा:याचा उतारा महापालिकेने शोधला होता. बंधाराही बांधला. मात्र म्हारळमधून वाहणारे नाल्याचे सांडपाणी रोखले गेले नसल्याचे तसेच नाला वळविला आहे तर तो नेमका कुठे वळविला आहे. मग पाणी थेट नदी पात्रत कसे मिसळत आहे. असे अनेक प्रश्न लिंगायत यांनी उपस्थित केलेआहेत.