तरुणीवर दोघांचा लैंगिक अत्याचार एकाला अटक; डोंबिवलीतील धक्कादायक घटना
By प्रशांत माने | Updated: September 21, 2023 16:34 IST2023-09-21T16:33:29+5:302023-09-21T16:34:49+5:30
तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली.

तरुणीवर दोघांचा लैंगिक अत्याचार एकाला अटक; डोंबिवलीतील धक्कादायक घटना
डोंबिवली: तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली. दरम्यान या घटनेप्रकरणी बुधवारी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी दिनेश गडारी (वय २२) नामक आरोपीला बेडया ठोकल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
पीडीत तरुणी तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. ती तिचे राहते घर सोडणार होती. तिने तिचे सामान तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. रविवारी रात्री पीडीत तरुणी आणि तिचा मित्र तिचे सामान घेण्यासाठी दिनेशच्या घरी गेले होते. त्याठिकाणी दिनेशचा एक मित्र होता. या दोघांनी तरुणीच्या मित्राला दारु आणण्याकरीता बाहेर पाठवले. तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा उठवत दिनेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
ती कशीबशी घराबाहेर पळाली तर दिनेशचा मित्राने तिला गाठले आणि एका रिक्षात कोंबत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे. दरम्यान याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी दिनेशला बेडया ठोकल्या आहेत तर त्याच्या मित्राला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.