उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले... इकडे शिवसेना नाव मुलीला मिळाले; नेमके काय घडले?

By मुरलीधर भवार | Published: January 21, 2023 08:04 PM2023-01-21T20:04:27+5:302023-01-21T20:36:14+5:30

मुलीचे नाव शिवसेना ठेवून मराठी माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेविषयी एक प्रकारची कृतज्ञताच व्यक्त केली आहे, असे म्हटले जात आहे.

Shiv Sainik Pandurang Wadkar From Dombivali named his girl Shivsena; Says, Balasaheb Thackeray came in a dream | उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले... इकडे शिवसेना नाव मुलीला मिळाले; नेमके काय घडले?

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे तिकडे भांडत बसले... इकडे शिवसेना नाव मुलीला मिळाले; नेमके काय घडले?

Next

डोंबिवली : मुलगी जन्माला आली की, अनेक जण त्यांच्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी कशी असतील याचा विचार करतात. मात्र डोंबिवलीतील पांडुरंग वाडकर या शिवसेना प्रेमीने त्याच्या मुलीचे नावच शिवसेना ठेवले आहे. त्यांनी मुलीचे नाव शिवसेना ठेवल्याने त्यांच्या मुलीच्या नावाची डोंबिवलीत एकच चर्चा आहे. 

त्याचे घडले असे वाडकर हे मूळचे महाडचे राहणारे. मात्र ते नोकरीनिमित्त त्यांच्या कुटुंबासह डोंबिवली पूर्व भागातील शेलारनाका परिसरात राहतात. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नावकरण त्याने केलेले नव्हते. रात्री ते कामावरुन दमून भागून आल्यावर शांत झोपी गेले. त्यांच्या स्वप्नात रात्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आले.

बाळासाहेब म्हणाले की, घाबरु नको, तुझ्या घरातच शिवसेना आहे. हा स्वप्न दृष्टांत पाहून झोपेत असलेले वाडकर एकदम खडबडून जागे झाले. त्यांना पडलेल्या स्वप्नाचा अर्थ नेमका काय हे त्यांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले. त्यांनी मुलीचे नाव शिवसेना ठेवून मराठी माणसाच्या हितासाठी लढणा:या बाळासाहेबांच्या शिवसेनेविषयी एक प्रकारची कृतज्ञताच व्यक्त केली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या पत्नीने काही एक विरोध केला नाही. आई वडिल आत्ता मुलगी शिवसेना हिच चांगचे खेळविताना दिसून येत आहेत. 

शिवसेनेने अनेक चढ उतार पाहिले. युतीची सत्ता पाहिली. त्यावेळी सत्तेचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेबांच्याच हाती होता. त्यानंतर युतीची सत्ता केली. आघाडी सरकार आले. त्यानंतर पुन्हा शिवसेना भाजप सत्तेवर आले. महाविकास आघाडी सरकारच्या वेळी तर बाळासाहेंबाचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. शिवसेनेच्या फूटीनंतर दोन पक्ष झाले. आत्ता बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे दोन पक्ष आहे. डोंबिवली शिवसेना शाखेची ख्याती मोठी होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी ताबा घेतला. त्याच डोंबिवलीत एका शिवसेना प्रेमीने मुलीचे नाव शिवसेना ठेवून बाळासाहेबांविषयीचे प्रेमच व्यक्त केले आहे. 

Web Title: Shiv Sainik Pandurang Wadkar From Dombivali named his girl Shivsena; Says, Balasaheb Thackeray came in a dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.