बीएसयूपी प्रकल्पातील घरांसाठी शिवसेना आक्रमक; शहरप्रमुखांनी दिला उपोषणाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:20 PM2021-11-10T15:20:46+5:302021-11-10T15:21:03+5:30

Kalyan : घरांचा ताबा मिळेपर्यंत प्रशासनाविरोधात दत्तनगर चौकात १५ तारखेपासून तीन दिवस लाक्षणिक उपोषणास बसू असा इशारा दिला आहे.

Shiv Sena aggressive for BSUP project houses; The mayor warned of a hunger strike | बीएसयूपी प्रकल्पातील घरांसाठी शिवसेना आक्रमक; शहरप्रमुखांनी दिला उपोषणाचा इशारा 

बीएसयूपी प्रकल्पातील घरांसाठी शिवसेना आक्रमक; शहरप्रमुखांनी दिला उपोषणाचा इशारा 

Next

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बीएसयूपी प्रकल्प हा वेगवेगळ्या वादात अडकला आहे. अनेक लाभार्थ्यांना अजून घरं मिळाली नाहीत. या मुद्द्यावरून आता शिवसेना आक्रमक झाली असून डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. 

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील जेएनएनयूआरएम (बीएसयूपी) प्रकल्पानुसार शहर झोपडपट्टी मुक्त योजना अमंलात आणण्यात आली. मात्र कल्याण डोंबिवलीत लाभार्थ्यांना अजून घरे मिळत नसल्याने, यात नक्की कोण दिरंगाई करत आहे? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. घरांचा ताबा मिळेपर्यंत प्रशासनाविरोधात दत्तनगर चौकात १५ तारखेपासून तीन दिवस लाक्षणिक उपोषणास बसू असा इशारा दिला आहे.

जेएनएनयूआरएम (बीएसयूपी) प्रकल्प सुरु होऊन ११ ते १२ वर्ष उलटली आहे. सुरुवातीला ठेकेदाराने लाभार्थ्यांना घरभाडे दिले. त्यानंतर काही महिन्यानंतर ठेकेदाराने घरभाडे देणे बंद केल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. एकीकडे राहते घर राहिले नाही आणि दुसरीकडे प्रकल्पातील घरे तयार असूनही ताबा मिळत नाही अशी अवस्था डोंबिवलीतील लाभार्थ्यांची झाली आहे. 

याबाबत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायवर आवाज उठवला आहे. मोरे यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र देऊन लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र सत्ताधारी सेनेवरच उपोषणाची वेळ आल्याने पालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते? ते पहावे लागेल.

Web Title: Shiv Sena aggressive for BSUP project houses; The mayor warned of a hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.