कल्याण- डोंबिवलीत शिवसेना अन् राष्ट्रवादीत आघाडी होणार; दोन्ही पक्षातील मंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 05:55 PM2022-02-12T17:55:34+5:302022-02-12T18:00:10+5:30

काँग्रेस भूमिका गुलदस्त्यात

Shiv Sena and NCP will take the lead in Dombivali, Minister Eknath Shinde and Minister Jitendra Awhad have indicated. | कल्याण- डोंबिवलीत शिवसेना अन् राष्ट्रवादीत आघाडी होणार; दोन्ही पक्षातील मंत्र्यांनी दिले संकेत

कल्याण- डोंबिवलीत शिवसेना अन् राष्ट्रवादीत आघाडी होणार; दोन्ही पक्षातील मंत्र्यांनी दिले संकेत

Next

कल्याण: महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काही हरकत नाही, असे विधान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

आज जितेंद्र आव्हाड यांनी केडीएमसी निवडणूकीत आघाडीसाठी आम्ही तयार आहोत असे विधान केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणूकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीची संकेत मिळत आहे. मात्र काँग्रेसची भूमिका काय आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

श्री मलंगगड क्रीकेट असोशिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी मलंग गड पट्टय़ात क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नगरसविकास मंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपरोक्त राजकीय संकेत दिले आहे. नगरसविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले की, क्रिकेट सामन्यांचे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र ग्रामीण भागातही चांगले क्रीकेट खेळणारे खेळाडू आहे. त्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव देण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठय़ा संख्येने खेळाडू सहभागी झाले आहे. या स्पर्धेत राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू गेले पाहिजेत अशी आपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. 

या क्रीकेट सामन्या 40 वर्ष वयोगटाच्या आत असलेल्या खेळाडूंचे 48 संघ सहभागी झाले आहे. तर 40 वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचे 10 क्रिकेट संघ सहभागी झाले आह. अंतिम सामना जिंकणा:या संघाला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 

Web Title: Shiv Sena and NCP will take the lead in Dombivali, Minister Eknath Shinde and Minister Jitendra Awhad have indicated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.