धाडसाचं कौतूक... 'त्या' बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांचा शिवसेनेकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 03:52 PM2021-12-13T15:52:05+5:302021-12-13T15:52:54+5:30

पोलिसांनी दाखवलेल्या कर्तबगारीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगत, गायकवाड यांनी तिन्ही पोलीस शिपायांच्या धाडसाचे कौतुकही केले.

Shiv Sena felicitates 'those' three brave police personnel of kalyan | धाडसाचं कौतूक... 'त्या' बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांचा शिवसेनेकडून सत्कार

धाडसाचं कौतूक... 'त्या' बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांचा शिवसेनेकडून सत्कार

Next
ठळक मुद्देया ठिकाणाहून गस्तीवर जात असलेले पोलीस हवालदार प्रवीण देवरे, पोलीस नाईक उत्तम खरात आणि कुणाल परदेशी यांनी प्रसंगावधान ओळखून जिवाची पर्वा न करता चाकूधारी तरुणावर झडप घालून त्याला जागीच जेर बंद केले

कल्याण - कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ओव्हरटेकच्या वादातून भर रस्त्यात झालेल्या भांडणात एका तरुणाने दोन तरुणांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. यावेळी गस्तीवर असतांना चाकू हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाच्या जागीच मुसक्या आवळून कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला  जेरबंद केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या या तीन बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांचा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सत्कार केला. पोलिसांनी दाखवलेल्या कर्तबगारीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगत, गायकवाड यांनी तिन्ही पोलीस शिपायांच्या धाडसाचे कौतुकही केले.

काटेमानिवली परिसरात सुरू होता थरार  

या ठिकाणाहून गस्तीवर जात असलेले पोलीस हवालदार प्रवीण देवरे, पोलीस नाईक उत्तम खरात आणि कुणाल परदेशी यांनी प्रसंगावधान ओळखून जिवाची पर्वा न करता चाकूधारी तरुणावर झडप घालून त्याला जागीच जेर बंद केले. त्यामुळे समोरच्या तरुणांवर होणारा जिवघेणा हल्ला टळला. अशा पोलीस कर्मचार्‍यांचे कौतुक व्हावे आणि अन्य पोलिसांचेही अशा गंभीर परिस्थितीत मनोधैर्य वाढावे या उद्देशाने स्थायी समिती सदस्य तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
 

Web Title: Shiv Sena felicitates 'those' three brave police personnel of kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.