कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठीचे १६ कोटी गेले कुठे?

By मुरलीधर भवार | Published: September 18, 2023 03:38 PM2023-09-18T15:38:13+5:302023-09-18T15:39:27+5:30

शिवसेना माजी नगरसेवकाचा संतप्त सवाल.

shiv sena former corporator asked where did the 16 crores for filling potholes in kalyan dombivli go | कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठीचे १६ कोटी गेले कुठे?

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठीचे १६ कोटी गेले कुठे?

googlenewsNext

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत काही विद्वान अधिकारी आले आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन त्यांची विद्वत्ता दाखवावी. गणपतीचे आगमन झाले आहे. रस्त्यावर खड्डे आणि त्या खड्ड्यात पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात येणारे १६ कोटी रुपये कुठे गेले ? असा थेट सवाल शिवसेनेचे मामाजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रशासनाला विचारला आहे. त्यामुळे आत्ता महापालिका प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण आयुक्तांनी खड्डे भरण्यात निष्काळी करणाऱ््यांच्या विरोधात कारवाई केले जाणार असल्याचे म्हटले होते.

शहरात रस्त्यावर खड्डे आहेत. हे खड्डे बुवजिण्यात महापालिकेकडून दिरंगाई केली जात आहे. या प्रकरणी अनेकांनी आवाज उठविला आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १६ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेनुसार महापालिका हद्दीतील १० प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत १३ कंत्राटदारांना खड्डे बुजविण्याचे काम विभागून दिले आहे. रस्त्यावरील खड्डे बुविण्यात निक़ष्ट दर्जाचे काम केले जात असल्याची पोलखोल शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यानी नुकतीच केली होती.

तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रशासनाला जाब विचारत रस्ते बुजविणयाच्या कामात टक्केवारी घेतली जाते. त्यामुळे कामे चांगल्या दर्जाची केली जात नाही या टिकेनंतर आयुक्त भाऊसाहेब दांगडे स्वत: रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी कामाची पाहणी केली हेती. या पाहणी पश्चात त्यांनी १३ सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील असा दावा केला होता. या दाव्यानुसार त्यांनी दिलेल्या डेडलाईन उलटून गेली तरी कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांची डेडलाईन फोल ठरली आहे. या पाश्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी मोहन उगले यांनी देखील प्रसासनाला लक्ष करुन रस्ते बुजविण्याच्या कामावर केला जाणार खर्च खड्ड्यात जाणार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गणरायांचे आगमन रस्तेमय खड्ड्यातून होत असल्याने उगले यानी प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 

Web Title: shiv sena former corporator asked where did the 16 crores for filling potholes in kalyan dombivli go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.