BJP MLA Ganpat Gaikwad उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच शिवसेना नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 11:56 PM2024-02-02T23:56:01+5:302024-02-02T23:57:36+5:30
Ganpat Gaikwad ( Ulhasnagar Firing Latest News ) उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.
उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या घटनेत शिवसेना नेते महेश गायकवाड जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलीस निरिक्षकांच्या केबीनमध्ये या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी हा गोळीबीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेली माहिती अशी, शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये एका विषयावर वाद होऊन कल्याण शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत. यांप्रकाराने खळबळ उडून दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकच गोंधळ पोलीस ठाणे व परिसरात घातला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या हाणामारी झाल्याचे प्रकार झाले. असे पोलिसांचे म्हणणे आहे. आमदार गणपत गायकवाड व सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महेश गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या असून दोन गोळ्या उजव्या खांद्यावर एक गोळी पाठीवर आणि एक गोळी मांडीवर लागली आहे. महेश गायकवाड गंभीर जखमी असून त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्या खांद्यावर आणि हाताला गोळी लागली आहे. दरम्यान त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे.
भाजपवाल्यांचे… pic.twitter.com/AnLrONCJzI— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 2, 2024