आजी म्हणाल्या, अंगावर गोळी झेलेल; शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या उत्तरानं सगळेच अवाक् झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:50 PM2022-01-21T19:50:31+5:302022-01-21T19:53:52+5:30
रेल्वे प्रशासनानं कल्याण, डोंबिवलीसह लोकसभा मतदारसंघातील इतर भागातील नागरिकांना बजावलेल्या घरं रिकामी करण्याच्या नोटिसांवरून वातावरण चांगलचं तापलय.
मयुरी चव्हाण
कल्याण - रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवलीसह लोकसभा मतदारसंघातील इतर भागातील नागरिकांना बजावलेल्या घरं रिकामी करण्याच्या नोटिसांवरून वातवरण तापलं आहे. डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरातील रेल्वेने नोटिसा बजावलेल्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी वेळ पडली तर अंगावर गोळ्यासुद्धा घ्यायला तयार आहे असं एक आजी म्हणाल्या यावर खासदार श्रीकांत शिंदेंनीही त्यांना प्रतिसाद दिला.
रेल्वे प्रशासनानं कल्याण, डोंबिवलीसह लोकसभा मतदारसंघातील इतर भागातील नागरिकांना बजावलेल्या घरं रिकामी करण्याच्या नोटिसांवरून वातावरण चांगलचं तापलय. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चांगलेच संतप्त झालेले पाहायला मिळाले. डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरातील रेल्वेने नोटिसा बजावलेल्या सिद्धार्थ नगरमधील रहिवाशांची भेट त्यांनी घेतली. यावेळी जोपर्यंत रेल्वे प्रशासन याठिकाणी राहणाऱ्या लोकांचे पुर्नवसन करणार नाही तोपर्यंत याठिकाणी कारवाई होऊ देणार नसल्याची आक्रमक भूमिका खासदार शिंदे यांनी घेतली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या एका आजीनं अतिक्रमण काढायला कोणी आलं तर अंगावर गोळ्या झेलेलं असं जाहीरपणे सांगितलं. याबर खासदार शिंदे यांनी तुम्ही कशाला आम्ही आहोत ना गोळी खायला अस उत्तर दिलं.
खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केलाय.रेल्वेला त्यांची जागा रिकामी करून हवी असेल तर त्यांनी अगोदर पुर्नवसन धोरण तयार करण गरजेचं आहे. त्याशिवाय इथली घरं रिकामी होणार नाही. आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे असून उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोणत्याही शासकीय योजनांमध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येकाचं पुनर्वसन केलं जातं. त्यानूसार रेल्वेनेही याप्रकरणी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक असून केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेने एकत्रितपणे समनव्य साधून हा मुद्दा सोडवण आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.