शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून स्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल
By मुरलीधर भवार | Published: September 15, 2023 06:38 PM2023-09-15T18:38:08+5:302023-09-15T18:59:03+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून गणेशोत्सवा आधी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दररोज नवी डेडलाईन दिली जाते.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून गणेशोत्सवा आधी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दररोज नवी डेडलाईन दिली जाते. इतकेच नाही तर निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी ठेकेदारांच्या विरोधात कारवाई करण्याचाइशारा दिला जातो. मात्र टिटवाळ्यात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम कसे निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. याची पोलखोल केली जात आहे. त्यानंतर या प्रकरणात आयुक्त काय कारवाई करतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.. गेल्या महिनाभरापासून हे खड्डे भरण्याचे मागणी नागरिक करीत आहेत..प्रशासनाकडून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.. गणेशोत्सव काही दिवसांनी येऊन ठेपलाय मात्र अद्यापही रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. ही कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे..कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात असल्याचे देखील सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवरील कामाची विदारक परिस्थिती समोर येते आहे. टिटवाळा परिसरात आज सकाळपासून रस्त्यांवरील खड्डे डांबराने भरण्याचे काम सुरू होते.सकाळच्या सुमारास पाऊस सुरू झाला.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख विजय देशेकर यांनी संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांना पाऊस सुरू झाला आहे. रस्त्यावर पाणी आहे. त्यात डांबर टाकू नका अशी सूचना केली.
मात्र त्यानंतर ही या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. भर पावसात रस्त्यावर पाणी साचलेले असताना देखील त्यावर डांबरीकरण सुरू होते. विजय दशेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला आहे. महापालिका आयुक्तांनी नित्कृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व जबाबदार असलेला अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होते. हा प्रकार आता समोर आलाय त्यामुळे महापालिका आयुक्त आता कारवाई करणार का? असा सवाल संतप्त देशेकर यांनी उपस्थित केला आहे.