...त्यावेळी शिवसेना एकच होती, कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी; आमदार राजू पाटील यांची मागणी
By मुरलीधर भवार | Published: July 2, 2023 01:52 PM2023-07-02T13:52:35+5:302023-07-02T14:54:18+5:30
मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
कल्याण : मुंबईत कोविड घोटाळा झाला आहेच, त्याबरोबर ठाणे, कल्याणडोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. त्यावेळी शिवसेना एकच होती. बीएमसी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट करत आमदार पाटील यांनी मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर ,अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत आमदार पाटील यांनी ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळा झालाच आहे पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये पण प्रचंड प्रमाणात कोविड घोटाळा झाला आहे. आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी 'त्यावेळी एकच शिवसेना होती.यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक होते.
दरम्यान गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावरून मनसे पाटील यांनी गेली २५ ते ३० वर्ष महापालिका शिवसेनेच्या ताब्यात . ठाकरे गटाचा मोर्चा एक फार्स आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू अशी टीका करत ठाकरे गटासह शिंदे सरकारला देखील लक्ष केले आहे.
या मोर्चा बाबत पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी असे मोर्चे निघाले पाहिजेत, त्यांनी इथे देखील एखादा मोर्चा काढावा. अशी कोणती महापालिका आहे, जिथे घोटाळे झालेले नाहीत. या महापालिका कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत. गेली ३० वर्ष या महापालिका शिवसेनेचा ताब्यात आहेत आता शिवसेनेत दोन गट झालेत. पूर्वी काय होते या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्यामुळे मोर्चा काढला हा फार्स आहे. याची सरकारने निष्पक्ष चौकशी करावी मात्र सरकारकडून तीही अपेक्षा नाही असा टोला आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटासह शिंदे सरकारला लगावला आहे.