बदलापूरमध्ये सेनेची नव्याने पक्षबांधणी, जुन्या कार्यकर्त्यांना आणणार प्रवाहात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:37 PM2022-08-14T13:37:17+5:302022-08-14T13:37:50+5:30

Shiv Sena : शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, माजी नगरसेवक शशिकांत पातकर आणि विभागप्रमुख किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

Shiv Sena's new party formation in Badlapur will bring old workers into the fold | बदलापूरमध्ये सेनेची नव्याने पक्षबांधणी, जुन्या कार्यकर्त्यांना आणणार प्रवाहात

बदलापूरमध्ये सेनेची नव्याने पक्षबांधणी, जुन्या कार्यकर्त्यांना आणणार प्रवाहात

Next

बदलापूर :  शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, माजी नगरसेवक शशिकांत पातकर आणि विभागप्रमुख किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. आता पुन्हा एकदा बदलापूरमध्ये शिवसेनेने पक्षबांधणीला सुरुवात केली. मातब्बर पदाधिकारी आणि नगरसेवक निघून गेल्यानंतरही शिवसेनेने आता नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीच्या दिशेने काम सुरू केले.
निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी विभागप्रमुख किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शहरात पुन्हा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने  कशा प्रकारे काम करायचे व पक्षबांधणी कशी करायची, याबाबत सूचना दिल्या. राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात कसे आणता येईल, तसेच ज्यांना पुन्हा पक्षात यायची इच्छा असेल त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. 

‘गैतवैभव प्राप्त होईल’
शहरात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी वसेनेचे विभागप्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पातकर, माजी उपनगराध्यक्ष प्रिया गवळी, उपशहर प्रमुख प्रशांत पालांडे, गिरीश राणे यांच्यासह अनेकसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार, असे निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते.

Web Title: Shiv Sena's new party formation in Badlapur will bring old workers into the fold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.