संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी, शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा सल्ला
By मुरलीधर भवार | Published: June 22, 2023 09:08 PM2023-06-22T21:08:58+5:302023-06-22T21:09:10+5:30
सुजित पाटकर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संजय राऊत झाले विचलीत.
कल्याण- संजय राऊत यांनी ठाणे, कल्याण डोंबिवलीमधील कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांना शिवसेना युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दीपेश म्हात्रे यांनी सुजित पाटकरवर ईडीच्या धाडी पडल्या, भ्रष्टाचाराचे आरोप झाला आहे. त्यामुळे संजय राऊत विचलित झाले आहेत. येत्या काळात सुजित पाटकर यांच्यासोबत कोणी भ्रष्टाचार केला, कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले. हे सगळे उघडकीस येणार आहे. त्यामुळे संजय राउत विचलित झालेत. त्यामुळे ते असे स्टेटमेंट करतात असा पलटवार केला. संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट घ्यावी असा सल्ला म्हात्रे यांनी राऊत यांना दिला आहे.