शहापूर तालुक्यात वीज चोरांना कारवाईचा शॉक; तब्बल ६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस
By अनिकेत घमंडी | Published: August 29, 2022 08:18 PM2022-08-29T20:18:14+5:302022-08-29T20:19:15+5:30
वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने सोमवारी दिली.
डोंबिवली: शहापूर तालुक्यातील सापगांव आणि आवारे गावातील १५ वीज चोरट्यांना महावितरणच्या पथकाने कारवाईचा शॉक दिला. या चोरट्यांनी ६ लाख १ हजार ६३० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने सोमवारी दिली.
सुनिल गोपाळ घरत रा. आवरे, ता. मुरबाड, जयश्री किरण भांडे, भगवान महादू शेळके, नवनाथ नारायण वगाडे, तुकाराम भगवान शेळके, रामदास दत्तु शेरे, रमेश सोनू शेरे, विठ्ठल मालू शेरे, बंडू नामदेव अंदाडे, सुदाम लहू भांडे, जयराम धोंडू भांडे, एल. पी. अंदाडे, हिरामण महादू गगे, प्रियंका मदन अंदाडे व सुरेश वसंत भोईर सर्व रा. सापगांव, ता. शहापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वच आरोपींनी काळ्या रंगाची २० मिलिमिटर सर्व्हिस वायर वापरून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले आहे.
उपविभागीय अभियंता अविनाश कटकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता सुरज आंबुर्ले व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणने केले.