बदलापुरातल्या 'त्या' चिमुकल्यांवर एक दोनदा नव्हे तर...; अहवालात खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:07 PM2024-08-23T20:07:11+5:302024-08-23T20:09:21+5:30

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसटीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Shocking information has come out from the report of the ST investigating the Badlapur school crime case | बदलापुरातल्या 'त्या' चिमुकल्यांवर एक दोनदा नव्हे तर...; अहवालात खळबळजनक खुलासा

बदलापुरातल्या 'त्या' चिमुकल्यांवर एक दोनदा नव्हे तर...; अहवालात खळबळजनक खुलासा

Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. १३ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय शिंदेने चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना आठवडाभरानंतर उघडकीस आली होती. या घटनेच्या तपासासाठी महायुती सरकाने एसआटीची स्थापन करुन चौकशी सुरु केली आहे. आता या प्रकरणात धक्कादाय बाब उघडकीस आली आहे. एसआटीच्या प्राथमिक अहवालात ३ आणि ३ वर्षांच्या दोन्ही मुलींचे गेल्या १५ दिवसांत एकदा नव्हे तर अनेक वेळा लैंगिक शोषण झाल्याचे म्हटलं आहे. यामुळे योनिपटलाचा भाग फाटल्याचेही अहवालात म्हटलं आहे.

बदलापुरातील दोन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरुन नागरिकांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला होता. सरकारनेही याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एसआटीने तपास सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल शाळा प्रशासन आणि पोलिसांची सखोल तपासणी केली जात आहे. समितीच्या चौकशी अहवालात हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या शाळा प्रशासनावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या घटनेबाबत १४ ऑगस्टलाच मुख्याध्यापकांनी शाळेच्या विश्वस्तांना कळवले होते. मात्र तरीही शाळेने घटनेची माहिती देण्यास उशीर केल्याचे अहवालात म्हटले आहे. असे असतानाही शाळा प्रशासनाने संबंधित पालकांना माहिती दिली नाही किंवा त्यांची भेटही घेतली नाही.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पीडित मुलींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात १२ तासांनी उपचार करण्यात आले. तसेच आरोपी अक्षय शिंदे याला त्याची ओळख आणि पार्श्वभूमी तपासल्याशिवाय त्याला शाळेत कामावर घेण्यात आले. अक्षयने १ ऑगस्टपासूनच कंत्राटी कर्मचारी म्हणून काम सुरू केले. त्याला शाळेच्या सर्व भागासह महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला गेला होता.

दरम्यान, अक्षय शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याचा संशय  असून त्याची पार्श्वभूमी तपासण्याची करण्यात येत आहे. त्यांची नियुक्ती कशी आणि कोणत्या संस्थेमार्फत करण्यात आली याचाही तपास करण्यात येत आहे. शाळेचे शौचालय कर्मचाऱ्यांच्या खोलीपासून दूर एका निर्जन ठिकाणी होते आणि सुरक्षेसाठी तेथे सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. शाळा व्यवस्थापनाने दावा केला होता की, दोन्ही मुलींनी बराच वेळ सायकल चालवली होती, त्यामुळे त्यांचा योनिपटलाचा भाग फाटला होती. मात्र एसआटीने अहवालातून सत्य समोर आणलं आहे.
 

Web Title: Shocking information has come out from the report of the ST investigating the Badlapur school crime case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.