धक्कादायक! अचानक धरणाच्या पाण्याचा प्रवाह वाढला अन् चारचाकी गेली वाहून; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 12:00 AM2024-08-04T00:00:13+5:302024-08-04T00:00:33+5:30

एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. परंतु एकजण अद्यापही बेपत्ता आहे .

Shocking Suddenly the water flow of the dam increased and the four wheeler was swept away One dead one missing | धक्कादायक! अचानक धरणाच्या पाण्याचा प्रवाह वाढला अन् चारचाकी गेली वाहून; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता!

धक्कादायक! अचानक धरणाच्या पाण्याचा प्रवाह वाढला अन् चारचाकी गेली वाहून; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता!

शाम धुमाळ, कसारा :कल्याण येथून गणपत चिमाजी शेलकन्दे हे आपल्या मित्रांसह शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या खाली पार्टीसाठी आले होते. शनिवारी दुपारी आपल्या एमएच १०,  एस ४४५५ या कारमधून गटारी पार्टीसाठी ते आले होते. मात्र धरणाच्या मागील बाजूला गाडी लावून पार्टीचे नियोजन सुरू असताना अचानक धरणाचे स्वयंचलित दरवाजे काही अंशी उघडले गेले व पाण्याचा लोट तानसा नदीच्या दिशेने वाहू लागला. काही समजण्याअगोदरच गाडी पाण्याखाली जाऊन वाहू लागली. गाडीत पाणी घुसत असल्याचे लक्षात येताच गाडीत असलेल्या ५ जणांनी उड्या मारल्या. त्यापैकी ३ जण सुखरूप बाहेर आले, तर एक जण गुदमरून मयत झाला. तसंच अन्य एक जण अद्याप बेपत्ता असल्याची घटना घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तानसा धरणाच्या खाली पार्टीसाठी आलेले पाच जण गाडीसह तानसा नदीत वाहून गेले. यात तीन जणांनी बाहेर उड्या मारल्याने बचावले, मात्र दोन जण गाडीत अडकले होते. यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. परंतु एकजण अद्यापही बेपत्ता आहे .

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी करण्यासाठी पाच जण आले होते. दुपारी पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित २४ दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते.

यापैकी तिघांनी बाहेर उड्या मारल्याने बचावले. मात्र दोन जण गाडीत अडकले होते. यात  १) गणपत चिमाजी शेलकंदे रा.कल्याण यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. मात्र एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू असून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Shocking Suddenly the water flow of the dam increased and the four wheeler was swept away One dead one missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण