रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 07:17 AM2024-09-29T07:17:22+5:302024-09-29T07:17:39+5:30

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील वास्तव

Shortage of medicines in hospitals, health of patients at risk; 40 lakhs in arrears, | रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,

रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,

- सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शासनाने मोफत उपचाराचा घेतलेला निर्णय व शासकीय अनुदानाअभावी मध्यवर्ती रुग्णालयासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठणाट झाला. त्यामुळे रुग्णांवर विनाऔषध राहण्याची वेळ आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. स्थानिक औषध दुकानदारांनी वाढत्या थकबाकीमुळे औषध देण्यास व ऑक्सिजन, नायट्रेट व स्पिरिट रिफिल करण्यास नकार दिल्याने, मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे. या दुकानदारांचे तब्ब्ल ५५ लाखांचे बिल थकले आहे.

उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाण्याचे प्रमुख डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय ठाणे प्रमुख डॉ. कैलास पवार यांनी आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई व सहसंचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन मुंबई विभागाला ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती दिली. सामान्य जिल्हा रुग्णालय ठाण्यासाठी १२ कोटी तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी २ कोटी तसेच औषध थकबाकीसाठी ५५ लाखांची 
मागणी केली.

अन्यथा अनर्थ होण्याची भीती 
मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रोज १५०० रुग्णांची नोंद असून, आंतररुग्णांची संख्याही क्षमतेपेक्षा जास्त आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून होणारा औषधपुरवठा ९० टक्के कमी झाला असून, मध्यवर्ती रुग्णालयाने स्थानिक दुकानांकडून खरेदी केलेल्या औषधांची थकबाकी ४० लाखांवर गेली.
नऊ लाखांचे ऑक्सिजन, नायट्रेट बिल आहे. दुकानदारांनी थकबाकीचे कारण देऊन ऑक्सिजन, नायट्रेट, स्पिरिट रिफिल देण्यास मनाई केल्याने अनर्थ होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. 

रुग्णांच्या उत्पन्नावर गदा
nरुग्णालयाला रुग्णांनी काढलेल्या केसपेपरमधून महिन्याला ५ ते ६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यातून स्थानिक दुकानातून औषधांची खरेदी केली जात होती.
nमोफत उपचार देण्याच्या निर्णयामुळे हे उत्पन्न बंद झाले व अनुदानही मिळत नसल्याने रुग्णालयांची कोंडी झाली.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना लिहीले पत्र
मध्यवर्ती रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे अनर्थ घडल्यास, त्याला डॉक्टर जबाबदार नाहीत. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी आ. कुमार आयलानी यांना दिली. त्यानंतर आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना परिस्थितीची माहिती देऊन औषध व अनुदानाची मागणी केली.

Web Title: Shortage of medicines in hospitals, health of patients at risk; 40 lakhs in arrears,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.