कोरोनामुळे अंगारकीनिमित्त श्री गणेश मंदिरात प्रवेश बंद; भक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:33 PM2021-03-02T12:33:15+5:302021-03-02T12:33:25+5:30

मंदिर प्रशासनाला भक्तांच्या काळजीसाठी निर्णय घेत मंगळवारी पहाटेपासून पूर्ण दिवसभर दर्शन बंद ठेवले होते.

Shri Ganesh temple closed due to corona; Devotees took darshan from outside | कोरोनामुळे अंगारकीनिमित्त श्री गणेश मंदिरात प्रवेश बंद; भक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

कोरोनामुळे अंगारकीनिमित्त श्री गणेश मंदिरात प्रवेश बंद; भक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

googlenewsNext

डोंबिवली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता टिटवाळा येथील महागणपतीचे दर्शन बंद ठेवण्यात आलेले असतानाच तेथे दर्शनाला जाता येत नाही म्हणून भक्त डोंबिवलित फडके पथ येथील श्री गणेश मंदिर संस्थानाच्या मंदिरात गर्दी करण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने मंगळवारी भक्तांसाठी दर्शन व्यवस्था दिवसभरासाठी बंद ठेवली होती.

त्याबाबत संस्थानाचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सांगितले की, मंदिर प्रशासनाला भक्तांच्या काळजीसाठी निर्णय घेत मंगळवारी पहाटेपासून पूर्ण दिवसभर दर्शन बंद ठेवले होते. भक्तांना प्रवेशद्वारातून गणेशाचा फोटो ठेवून रंगेतूनच दर्शन घेण्याची रचना लावण्यात आली होती. दिवसभर भक्तांनी रांगेतून रस्त्यावरून दर्शन घेतले, तेथेच त्यांनी आणलेला प्रसाद, हार घेऊन ते परत दिले जात होते. तसेच ज्यांना देणगी, अभिषेक करायचा होता ते स्वीकारण्याची योजना करण्यात आली होती.

सोवळ्यातील भटजी हे भक्तांना मार्गदर्शन करत होते. तसेच द्वारपाल भक्तांना फिजिकल डिस्टन्स पाळण्यासंदर्भात मार्गदर्शन करत होते. गणेशाच्या मूर्तीचे दर्शन नाही मिळाले तरीही बाहेरून प्रवेशद्वारावर दर्शन सोय केल्याने भक्तांनीही मंदिर प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करून सहकार्य केले. बुधवारपासून नित्य ठरल्याप्रमाणे कोविड 19 च्या मार्गदर्शक तत्वानुसार दर्शन सुविधा असेल असेही सांगण्यात आले. 

Web Title: Shri Ganesh temple closed due to corona; Devotees took darshan from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.