कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याकरीता स्वाक्षरी मोहीम

By मुरलीधर भवार | Updated: May 18, 2023 18:47 IST2023-05-18T18:46:24+5:302023-05-18T18:47:12+5:30

नागरीकांनी ५ हजार सह्यांची निवेदने नागरीकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन आज सादर केली आहे.

Signature campaign for U type road in Kalyan East | कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याकरीता स्वाक्षरी मोहीम

कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याकरीता स्वाक्षरी मोहीम

कल्याण-कल्याण पूर्व भागातील यू टाईप रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी कल्याण पूर्व विकास समितीने सह्याची मोहिम राबविली आहे. नागरीकांनी ५ हजार सह्यांची निवेदने नागरीकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन आज सादर केली आहे.

यावेळी संजय निरभवणे, प्रशांत मोरे, भाऊसाहेब वाणीकर, राम मोहिते, मनोज नायर, पूजा सरदार , राधिका गुप्ते, मिनाक्षी अहिरे आदींनी आयुक्तांची भेट घेतली. काटेमानिवली नाका ते कोळसेवाडी रिक्षा स्ट’ण्ड समोरील गणेश मंदीर ते सिद्धार्थ नगर तिसगाव नाका हा यू टाईप रस्ता आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांचे प्रथम पुनर्वसन करावे. त्यानंतरच रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे या मागण्यासाठी ५ हजार जणांच्या स्वाक्षरीचे निवेदने आयुक्तांना सादर केली गेली.

या पुढेही स्वाक्षरीची मोहिम सुरुच राहणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मागणीस या भागातील शाळा, सोसायट्या यांचीही पाठिंबा पत्रे आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे विकास समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Signature campaign for U type road in Kalyan East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण