"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:59 PM2024-08-20T14:59:48+5:302024-08-20T15:00:04+5:30

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

SIT formed to probe Badlapur School case Announcement by Home Minister Devendra Fadnavis | "मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

Badlapur School Case: बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरात बंद पुकारण्यात आला आहे. तर संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करुन रेल्वेमार्ग रोखून धरला आहा. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी सोमवार बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा यासाठी सरकार तात्काळ प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

"बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. शाळेतील दोन लहान मुलींना सफाई कर्मचाऱ्याने ज्या प्रकार अत्याचार केला ते अतिशय निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा लोकांमध्ये उद्रेक पाहायला मिळतो आहे. आम्ही तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी भारती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र तयार करण्यास सांगितले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा हा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी कारवाईची सुरुवात वेगाने करण्यात आलेला आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"लोकांचा जनसुमुदाय स्वयंस्फूर्तीने आला की कसा आला याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. भावनांचा उद्रेक असू शकतो. तिथे तात्काळ फाशीची मागणी केली जात आहे. मला असं वाटतं की, कायद्यानुसार जे तात्काळ करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ज्या संवेदनशिलतेने काम केले पाहिजे तसा प्रयत्न पोलिसांचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ यासाठी प्रयत्न करायला हवा. ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्यामध्ये कोणीही दिरंगाई केली आहे का किंवा कोणी काही लपवले का याची चौकशी एसआटीमार्फत होणार आहे. पीडितांच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, एफआयआर दाखल करायला जाणीवपूर्वक उशीर केला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Web Title: SIT formed to probe Badlapur School case Announcement by Home Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.