महाअंनिसतर्फे टिटवाळ्यात आकाशदर्शन संपन्न; विद्यार्थी-पालक आश्चर्यचकित

By सचिन सागरे | Published: March 11, 2024 01:33 PM2024-03-11T13:33:14+5:302024-03-11T13:33:30+5:30

आकाशातील ग्रहगोल, तारे ,नक्षत्र, राशी यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली

Sky Darshan in Titwala by Maha Annis; Student-parents are surprised | महाअंनिसतर्फे टिटवाळ्यात आकाशदर्शन संपन्न; विद्यार्थी-पालक आश्चर्यचकित

महाअंनिसतर्फे टिटवाळ्यात आकाशदर्शन संपन्न; विद्यार्थी-पालक आश्चर्यचकित

कल्याण : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा ठाणे आणि द सायन्स पॉइंट ऍक्टिव्हिटी अड्डा तर्फे घोटसई येथील सरस्वती विद्यालय प्रांगणात आकाशदर्शन संपन्न झाले.

आकाशातील ग्रहगोल, तारे ,नक्षत्र, राशी यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या आफाट विश्वात आपल्या पृथ्वीचं स्थान, आपली सूर्यमाला, आकाशगंगा आणि संपुर्ण विश्व यांची तुलनात्मक माहिती पाहताना अनेक विद्यार्थी आणि पालक आश्चर्यचकित झाले होते.

पीपीटी शोच्या माध्यमांतून माहिती दिल्यानंतर प्रत्यक्ष  टेलिस्कोपमधून गुरू ग्रह, त्याचे उपग्रह, तारे आणि लेसरच्या मदतीने अवकाशात असणारे तारकापुंज पाहताना विद्यार्थी विज्ञानाचा अद्भुत नजारा पाहून आवाक होत होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नही विचारले, त्यांच्या शंकांचं समाधान करताना प्रा. नितीन शिंदे यांनी अतिशय सोप्या आणि त्यांना समजेल अश्या शब्दांत उत्तरं दिली.

टिटवाळा  शहर आणि परिसरातील विविध विद्यालयांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच महा अंनिस चे ठाणे जिल्हा आणि राज्य पदाधिकारी असलेले उत्तम जोगदंड, विजय परब, परेश काठे, अमोल चौगुले, किशोर पाटील, राजेश देवरुखकर यांसह अनेक कार्यकर्तेही  उपक्रमाला उपस्थित होते. सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी उपक्रमास विशेष सहाय्य केलं..

Web Title: Sky Darshan in Titwala by Maha Annis; Student-parents are surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.