"घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यात येणार, पर्यावरणाचा समतोल राखण्यास होणार मदत"

By सचिन सागरे | Published: June 4, 2023 03:59 PM2023-06-04T15:59:13+5:302023-06-04T16:02:54+5:30

"त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे. त्याबरोबर कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होईल."

Solid waste management department will now take all CNG-powered vehicles, helping to maintain environmental balance says KDMC Commissioner Dr. Dangde | "घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यात येणार, पर्यावरणाचा समतोल राखण्यास होणार मदत"

"घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यात येणार, पर्यावरणाचा समतोल राखण्यास होणार मदत"

googlenewsNext

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजीवर चालणारी वाहने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे. त्याबरोबर कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होईल. आपण जे‍ नविन प्लान्ट नव्याने उभारत आहोत (प्रोसेसिंग प्लांट) त्यामध्ये ओल्या कच-यापासून सीएनजी प्लांट उभारणार आहोत आणि त्यामुळे नविन गाड्या या सीएनजीवर चालतील अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. महापालिका मुख्यालयाजवळील सुभाष मैदान येथे रविवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ४३ घंटा गाडयांचे ( स्वच्छ भारत मिशन १ मधून) लोकार्पण करतेवेळी त्यांनी ही माहिती दिली.

या गाडयांबरोबरच आपण १३ मोठे रिफ्युज कॉम्पॅक्टर खरेदी करत आहोत. त्याचबरोबर ४ मेकॅनिकल पॉवर स्विपर (स्वच्छ भारत मिशन २ मधून) आणि धुळ नियंत्रण ठेवण्यासाठी २ फॉगिंग मशिन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाच्या, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून खरेदी करत असल्याची माहिती देत कल्याण डोंबिवली परिसर पूर्णपणे कचरा मुक्त करणे हेच आपले उद्दीष्ट असले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. दांगडे यांनी केले.

यासमयी घनकचरा व वाहन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, स्वच्छ भारत मिशन अभियानाचे महापालिकेचे ब्रॅन्ड ॲम्बसेडर डॉ. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता प्रविण पवार, महापालिका सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, दिनेश वाघचौरे, संजयकुमार कुमावत, भरत पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: Solid waste management department will now take all CNG-powered vehicles, helping to maintain environmental balance says KDMC Commissioner Dr. Dangde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.