आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:43 PM2022-06-13T17:43:01+5:302022-06-13T17:43:17+5:30

सध्या हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Solve the problem first then come to ask for votes MNS banner is a topic of discussion | आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

googlenewsNext

कल्याण-येथील शहाड परिसरातील आंबिका नाला अरुंद आहे. तसेच या भागात नाल्यावर बेकायदा बांधकामे झालेली आहे. ९ जून रोजी पहिल्या पावसाचा फटका शहाड परिसराला बसला. या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकाऱ्याने एक बॅनर आंबिकानगर येथे लावला आहे. त्यावर आधी प्रश्न सोडवा. मग मते मागायला या असे लिहिले आहे. सध्या हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मनसेचे पदाधिकारी पंकजराजे पाचपिंडे यांना हा बॅनर लावला आहे. ९ जून रोजी नाल्याचे पाणी तुंबले. ते रस्त्यावर कसे साचले. त्यात वाहने कशा प्रकारे आडकली. याचे फोटोही बॅनरवर लावले आहे. एका तासाभराच्या पावसाने ही स्थिती उद्धवते. आधी प्रश्न सोडवा. मगच मते मागायला या. प्रश्न सोडविला नाही तर मते मिळणार नाहीत असा इशारा राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींना दिला आहे.

Web Title: Solve the problem first then come to ask for votes MNS banner is a topic of discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे