आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडल्याने कल्याण, बदलापूरमध्ये विशेष तिकीट खिडकी
By अनिकेत घमंडी | Published: July 25, 2023 05:01 PM2023-07-25T17:01:50+5:302023-07-25T17:02:46+5:30
ऑनलाइन सेवेतर्फे लांबपल्याच्या गाड्यांची तिकीट, मासिक पास, तसेच दैनंदिन तिकीट देखील प्रवासी काढतात.
डोंबिवली - ऑनलाइन रेल्वे सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन रेल्वे करते, त्याला प्रवासी चांगला प्रतिसाद देखील देत आहेत, मात्र ती वेबसाईट तांत्रिक कारणाने सोमवारी रात्री २.५६ वाजेच्या सुमारास बंद पडली होती, मंगळवारी दुपारी दीडनंतर ती सुरू झाली, त्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कल्याण, बदलापूर या स्थानकात रेल्वेने तीन विशेष तिकीट खिडक्या सुरू केल्या. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादमिळाला होता.
ऑनलाइन सेवेतर्फे लांबपल्याच्या गाड्यांची तिकीट, मासिक पास, तसेच दैनंदिन तिकीट देखील प्रवासी काढतात. कोविड काळात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता अनेक नेटकरी त्याचा लाभ घेत असल्याने रेल्वे स्थानकातच येऊन तिकीट काढावे लागत नाही अशी व्यवस्था असल्याने लाखो प्रवाशांच्या ती सेवा पसंतीस उतरली आहे. ती यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने एकूण १२ विशेष खिडक्या सुरू केल्या त्यात कल्याणमध्ये दोन, बदलापूरमध्ये एका खिडकीचा समावेश होता, जशी वेबसाईट सुरू झाली तशी ही विशेष सुविधा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.