डोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात; कोविड रुग्णालयातील स्टाफ झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:54 PM2021-05-15T18:54:59+5:302021-05-15T18:56:03+5:30
कल्याण-डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. तिला लंग्ज इन्फेक्शन झालेले असताना तिला बरे करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाने बरीच मेहनत घेतली.
कल्याण-डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. तिला लंग्ज इन्फेक्शन झालेले असताना तिला बरे करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाने बरीच मेहनत घेतली. गुंजन कोरोनातून बरी झाल्याने सगळया स्टाफला एकच आनंद झाला आहे. आज गुंजनाला घरी सोडण्यात आले. त्यावेळी सगळा स्टाफ तिला निरोप देण्यासाठी गेटर्पयत आला आणि भावूक झाला होता.
डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा परिसरात निर्मल पासड (२८) राहतात. ते एका स्टील कंपनीत कामाला आहे. कोरोनामुळे त्यांना आत्ता काम नाही. कोरोनाची दुसली लाट सुरु असताना १९ एप्रिल रोजी त्यांचे कुटुंब कोरोनामुळे बाधित झाले. एकाच वेळी निर्मल यांच्यासह त्यांच्या पत्नी किंजल (२७), त्यांचे वडील महेंद्र आणि विश्ेाष तरुणी असलेली त्यांची बहिण गुंजन (३५) या चौघांना कोरोनाची लागण झाली. १९ एप्रिल रोजी बेडची कमरतता होती.
कुठेही बेड मिळत नव्हता. त्यामुळे एकाच वेळी एकाच रुग्णालयात चार बेड कुठून उपलब्ध होणार या टेन्शनमध्ये निर्मल होते. त्यांनी बेडसाठी धावपळ सुरु केली. त्यांनी त्यांचे मुलुंड येथे राहणारे भाऊ निरव पासड यांच्याशी संपर्क साधला. निरव यांनी त्यांच्या मित्रच्या मदतीने बेड मिळविण्यासाठी धडपड सुरु केली. निरव व त्यांच्या मित्रंनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना ट¦ीट केले. खासदार शिंदे यांनी या ट¦ीटची दखल घेत डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालये डॉ. राहूल घुले यांना ही बाब सांगितली.
घुले यांनी तातडीने पासड कुटु्ंबातील चौघांना चार बेड उपलब्ध करुन दिले. निर्मल, त्यांची पत्नी, वडिल आणि विशेष तरुणी असलेली त्यांची बहिण यांच्यावर उपचार सुरु झाले. निर्मल यांना त्यांच्या वडिलांसह त्यांच्या बहिणीची चिंता अधिक सतावित होती. कारण बहिण गुंजन ही मानसिक रुग्ण आणि शरीराने अपंग आहे. उपचारासाठी दाखल झाल्यावर चौथ्या दिवशी त्यांची बहिण गुंजन यांची ऑक्सीनज लेव्हल कमी झाली. त्यांच्या लंग्जमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला होता. त्याचे प्रमाणही जास्त होते. त्यावेळी डॉक्टर अन्य स्टाफने विशेष तरुणी असलेल्या गुंजन यांच्या उपचारावर विशेष मेहनत घेत पासड कुटुंबियांना मानसिक आधार देत त्यांचे धैर्य वाढविण्यास मदत केली.
४ मे रोजी निर्मल, त्यांची पत्नी आणि वडिल हे कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतले. मात्र गुंजनवर उपचार सुरुच होते. गुंजन देखील कोरोनातून बरी झाली आहे. एका विशेष तरुणीला कोरोनाच्या जबडय़ातून बाहेर काढून तिला बरी केल्याने डॉक्टरांच्या आव्हानात्मक कृत्याला पासड कुटुंबियांनी सलाम केला आहे. त्याचबरोबर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांचेही आभार व्यक्त केले आहेत.