विज्ञानोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By सचिन सागरे | Published: December 18, 2022 04:12 PM2022-12-18T16:12:30+5:302022-12-18T16:13:29+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे पर्यावरणाची होणारी हानी
डोंबिवली :
पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देणारे प्रदर्शन विज्ञानोत्सवामध्ये सादर केल्याचे लोकमान्य गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी गार्गी चव्हाण या विद्यार्थिनीने सांगितले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा टिळकनगर विद्यामंदिर येथे रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केडीएमसीचे शिक्षणाधिकारी विजय व्ही. सरकटे यांच्या हस्ते विज्ञानोत्सवाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, बायोगॅस सयंत्र, पर्यावरणस्नेही वातानुकूलित यंत्र यासारख्या विषयावरील प्रयोग ठेवण्यात आले होते. सदर विज्ञानोत्सवामध्ये केडीएमसी क्षेत्रातील तसेच ठाणे, रायगड, मुंबई आणि उपनगरातील सुमारे ३० शाळेतील ५५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
विज्ञान या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतुहुल वाढविणे, नविन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने मंडळाचा शिक्षण विभागातर्फे विज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वैज्ञानिक खेळ, चित्रफीत, नवनवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान याची अनोखी सफर विद्यार्थ्यांना या विज्ञानोत्सवाच्या माध्यमातून घडली.