जुने कपडे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:22 AM2020-12-14T00:22:42+5:302020-12-14T00:22:46+5:30

एका दिवसात चार टन कपडे जमा करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

Spontaneous response to the old clothes collection campaign | जुने कपडे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जुने कपडे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

कल्याण  : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी प्लास्टिक व जुने कपडे संकलन मोहीम राबवली जाणार आहे. रविवारी पहिल्याच दिवशी कपडे संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कल्याण-डोंबिवलीतील आठ केंद्रांवर ही मोहीम पार पडली. एका दिवसात चार टन कपडे जमा करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.
केडीएमसीच्या वतीने सध्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. नागरिकांकडून सुका कचरा देताना कापड, प्लास्टिक, फर्निचर, काच एकत्रित दिले जाते. त्यामुळे या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना अडचणी येतात. या  पार्श्वभूमीवर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मोहीम सामाजिक संस्थांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. 
महिन्याचा पहिला रविवार ई-कचरा, दुसऱ्या रविवारी प्लास्टिक आणि जुने कपडे, तिसऱ्या रविवारी काच, तर चौथा रविवार फर्निचर संकलन करण्यासाठी ठरवण्यात आला आहे. 
महिन्याच्या दुसऱ्या रविवारी राबवण्यात आलेल्या कपडे संकलन मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कापडी पिशव्या तयार करणार
प्लास्टिक संकलनाला फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र काही केंद्रांवर दिसून आले. आठ केंद्रांवर पार पडलेल्या या मोहिमेचा आढावा उपायुक्त कोकरे यांच्याकडून घेण्यात आला. जमा झालेल्या कपड्यांतून कापडी पिशव्या तयार केल्या जाणार आहेत. महिला बचतगटाच्या माध्यमातून त्या स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे कोकरे यांनी सांगितले. 

Web Title: Spontaneous response to the old clothes collection campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.