अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी करा; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:28 PM2021-07-21T15:28:13+5:302021-07-21T15:30:03+5:30

आयुक्तांच्या आदेशानुसार बल्याणी परिसरात रस्ता खचल्याने पावसाचे पाणी परिसरातील चाळींमध्ये शिरले होते.

Spray disinfectant in waterlogged colonies; Orders of KDMC Commissioner | अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी करा; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी करा; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

Next

कल्याण- गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी करा असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग क्षेत्र अधिका:यांना दिले आहेत. पाणी साचलेल्या परिसरात जंतूनाशक, डास अळी नाशक, दुर्गंधीनाशक फवारणी करण्यात यावी. पावसाचे पाण्याचा निचरा झाल्यावर घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य निरिक्षकांनी फवारणी करावी. 

आयुक्तांच्या आदेशानुसार बल्याणी परिसरात रस्ता खचल्याने पावसाचे पाणी परिसरातील चाळींमध्ये शिरले होते. त्याठिकाणी प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी फवारणी केली आहे. पिसवली, तुकाराम चौक, विको नाका, समतानगर, देशमुख होम्स, दावडी रोड, गोळवळी परिसरातही पाणी साचले होते. कांचन गाव, दिनेशनगर या चाळीमध्ये पाणी शिरले होते. त्याचबरोबर नांदीवली, समर्थनगर, भोपरनाला, गांधीनगगर परिसरात साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑईल फवारणी केली आहे. यासाठी प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

उर्वरीत भागातही पावसाच्या पाण्याचा निचरा होताच फवारणी करण्यात येणारअसल्याचे प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी सांगितले. फवारणीसाठी चार जीप धुरावणीचे 31 हॅण्ड पंप, 10 मल्टीजेट ट्रॅक्टर, 122 जंतूनाशक फवारणीचे हॅण्ड पंप यांचा वापर करुन फवारणी केली जात आहे. पावसाचे पाणी साचलेल्या भागातून पावसाळी संसर्गजन्य साथीचे आजार फसरु शकतात. त्यासाठी ही खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी अधिकारी वर्गास बजावले आहे.

Web Title: Spray disinfectant in waterlogged colonies; Orders of KDMC Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.