शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By मुरलीधर भवार | Published: March 24, 2024 09:24 PM2024-03-24T21:24:40+5:302024-03-24T21:25:07+5:30
'ओमर अब्दुल्लाला जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल ?'
कल्याण: जम्मू कश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही असे विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही' असे वक्तव्य केले.
ओमार अब्दुल्लाचा महाराष्ट्र राज्यभर निषेध सुरू आहे, मी देखील तीव्र शब्दात निषेध करतो. प्रत्यक्षात काश्मीरला सगळ्यात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून जातात. टुरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून काश्मीरला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळते. ज्यांनी हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले. त्यांनी ओमार अब्दुल्लाना विचारण्याची हिंमत ठेवावी अडीच वर्षात सत्तेसाठी लाचारी पत्करली व आत्ता २०२४ मध्ये सत्तेचे अपेक्षाने लाचारी पत्करतायत.
जे राहुल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचं काम तसेच त्यांचे स्वागत करण्याचं काम हे करतात. ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार प्रत्येकाचा मनात फुलवण्याचं काम केलं . त्या शिवतीर्थावर एकदा हिंदू शब्द उच्चारण्याची देखील त्यांची हिंमत झाली नाही. तर ओमर अब्दुल्लाला विचारण्याची हिंमत कुठून येईल ?अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची त्यांची हिंमत झाली नाही, तर ओमर अब्दुल्लाला जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल ?-
— Lokmat (@lokmat) March 24, 2024
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला pic.twitter.com/QJe6VfBn1s
महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग भगवा
आज होळीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय .उद्या धुलीवंदन साठी नागरिकांमध्ये एकच उत्साहात वातावरण पाहायला मिळतोय . कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मधील होळीच्या विविध कार्यक्रमांना आज हजेरी लावली होती . कल्याण पूर्वेकडील एका कार्यक्रमात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग कोणता असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी भगवा असेल असे उत्तर दिले .