कल्याण क्रिडा महोत्सवात सेंट लॉरेन्स शाळेला विजेतेपद तर सेंट थॉमस शाळेला उपविजेतेपद

By मुरलीधर भवार | Published: January 16, 2024 08:02 PM2024-01-16T20:02:44+5:302024-01-16T20:02:55+5:30

क्रिकेट स्पर्धेमध्ये संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीने पनवेलच्या करण क्रिकेट क्लब पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले तर करण क्रिकेट क्लबला उपयोजिते पदावर समाधान मानावे लागले.

St. Lawrence School won the Kalyan Sports Festival and St. Thomas School the runner-up | कल्याण क्रिडा महोत्सवात सेंट लॉरेन्स शाळेला विजेतेपद तर सेंट थॉमस शाळेला उपविजेतेपद

कल्याण क्रिडा महोत्सवात सेंट लॉरेन्स शाळेला विजेतेपद तर सेंट थॉमस शाळेला उपविजेतेपद

कल्याण - स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सव मधील शालेय बॅडमिंटन क्रिकेट आणि ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली झाली. बॅडमिंटन स्पर्धा कल्याण स्पोर्ट्स क्लब आधारवाडी येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये सेंट लॉरेन्स शाळेने विजेतेपद तर सेंट थॉमस शाळेने उपविजेतेपद पटकावले

क्रिकेट स्पर्धेमध्ये संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीने पनवेलच्या करण क्रिकेट क्लब पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले तर करण क्रिकेट क्लबला उपयोजिते पदावर समाधान मानावे लागले. अथलेटिक्स या स्पर्धेमध्ये कल्याणच्या अजिंक्यतारा क्लबने विजेतेपद तर गुरुनानक शाळेने उपविजेतेपद पटकावले. या तिन्ही स्पर्धेमध्ये 370 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा ८,१०,१२, १४ आणि १६ या वयोगटात घेण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी क्रिकेट प्रशिक्षक संतोष पाठक, बॅडमिंटनचे प्रशिक्षक खेळाडू सुधांशू ठाकूर हे उपस्थित होते. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू सुतार, मितेश जैन, गणेश भंडारी, परेश हिंदुराव, राम निंबाळकर, नितीन पाटोळे, नरेंद्र वामनोरे यांनी मेहनत घेतली.

कल्याण क्रीडा महोत्सव प्रमुख आयोजक संदीप आेंबासे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यामधील छोट्या खेळाडूंमध्ये क्रीडाचे वातावरण तयार करण्यासाठी आणि छोट्या खेळाडूंना ही स्पर्धेमध्ये वाव मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून कल्याण क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या क्रीडा महोत्सवामध्ये ८ वर्षाखालील १० वर्षाखालील आणि १२ वर्षाखालील या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होते.

Web Title: St. Lawrence School won the Kalyan Sports Festival and St. Thomas School the runner-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.