डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु

By अनिकेत घमंडी | Published: January 13, 2023 03:26 PM2023-01-13T15:26:23+5:302023-01-13T15:27:07+5:30

चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. 

state level rose exhibition started in dombivli | डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु

डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु

Next

डोंबिवली: मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवलचे उदघाटन शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत झाले. राज्यातील विविध भागातून आलेल्या गुलाब पुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांनी गुलाबांचा राजा व गुलाबांची राणी हे दोन्ही पुरस्कार पटकविले. चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. 

पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार तर वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार मिळाला. गुलाब पुष्प स्पर्धेचे परीक्षण डॉ विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे यांनी केले. धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षात चांगली सुरुवात व्हावी म्हणून गेली डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजित करण्यात येत असून १३,१४,१५ जानेवारी रामनगर येथील बालभवन रसिक गुलाबप्रेमींसाठी विनामूल्य असतो. 

या वर्षी सुमारे हजारावर गुलाब पुष्पे प्रदर्शनात मांडली असून शेकडो रंग, सुवासाची फुले पाहायला मिळतील. त्याच बरोबर दुरंगी, रेघांची, मिनिएचर स्वरूपातील गुलाब पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. सांगलीच्या पटवर्धन यांची अनेक देशांनी प्रसिद्ध केलेली गुलाब चित्र टपालतिकिटे प्रदर्शनात मांडलेली पाहायला मिळतील अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली. 

इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत. डोंबिवली रोझ फेस्टिवलशी पहिल्या वर्षांपासून निगडित असलेल्या म्हसकर या डॉक्टर दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: state level rose exhibition started in dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.