दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By मुरलीधर भवार | Published: October 11, 2023 04:17 PM2023-10-11T16:17:38+5:302023-10-11T16:19:03+5:30

कल्याणमधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या.

Steal by day Reiki by night; Three persons who stole expensive batteries have been shackled by the police in kalyan | दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण- बॅटरीच्या दुकानाची रेकी करत रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ््या त्रिकूटाला कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.नौशाद खान, मुजीब खान आणि सलमान खान अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत. हे तिघेही आरोपी मुंब्रा कौसा येथील राहणारे आहेत. या तिघांकडून वाहनाची ,इन्व्हर्टरची बॅटरी असा २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह एक गाडी जप्त करण्यात आली आहे. या तिघांविरोधात याआधी देखील बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनि दिली आहे .

कल्याणमधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला. या चोरट्यांची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्यात काही दिवसातच या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. हे चोरटे वाहनांची व इन्व्हर्टरला लागणारा बॅटरी चोरी करायचे यासाठी ते बॅटरीच्या दुकानांची रेकी करायचे. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संधी साधत या दुकानांमधील बॅटरी चोरी करायचे. त्यांच्या विरोधात यापूर्वीही बॅटरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणजी घेटे यांनी दिली आहे.

Web Title: Steal by day Reiki by night; Three persons who stole expensive batteries have been shackled by the police in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.