AC Local: मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, सर्वाधिक ९५ हजार प्रवासी डोंबिवलीकर

By अनिकेत घमंडी | Published: August 8, 2022 07:04 PM2022-08-08T19:04:18+5:302022-08-08T19:04:50+5:30

AC Local of Central Railway: मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी एसी उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Strong response of passengers to AC local of Central Railway, highest 95 thousand passengers to Dombivlikar | AC Local: मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, सर्वाधिक ९५ हजार प्रवासी डोंबिवलीकर

AC Local: मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, सर्वाधिक ९५ हजार प्रवासी डोंबिवलीकर

Next

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली - मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी एसी उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी-२०२२ मध्ये दररोजच्या सरासरी ५,९३९ प्रवासी संख्येवरून जुलै-२०२२ मध्ये ३४,८०८ प्रवासी प्रवास करत असल्याची आकडेवारी सोमवारी जनसंपर्क विभागाने जाहीर।केलेल्या माहितीवरून समोर आली आहे.

आता प्रवासी संख्या जवळपास ६ पटीने वाढली असून ५ महिन्यात डोंबिवली, कल्याण, घाटकोपर, ठाणे, मुंबई या प्रमुख रेल्वे स्थानकातील सुमारे ३ लाख ८१ हजार प्रवाशांनी आतापर्यंत या लोकलचा लाभ घेतला आहे. शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेच्या इतर साधनांच्या तुलनेत एसी उपनगरीय लोकलने प्रवास करणे केवळ जलदच नाही तर सर्वात सुरक्षित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या वस्तुस्थितीमुळे एसी लोकलला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. दि. ५ मे पासून सिंगल ट्रॅव्हल तिकिटाचे दर ५०% कमी केल्यानंतर प्रतिसादही वाढला आहे.\

फेब्रुवारी ते जुलै २०२२ या कालावधीतील तिकीट विक्रीच्या सिंगल आणि सीझन तिकीट दोन्ही बाबतीत मध्य रेल्वेची ५ टॉप स्थानके असून डोंबिवली ९४,९३२ तिकिटे, ठाणे ८४,३०९ तिकिटे, कल्याण ७७,४१२ तिकिटे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ७०,४४४ तिकिटे , घाटकोपर ५३,५१२ तिकिटे वितरित झाले असल्याची आकडेवारी मिळाली असून आरामदायी प्रवासात डोंबिवलीकर प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. 

Web Title: Strong response of passengers to AC local of Central Railway, highest 95 thousand passengers to Dombivlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.