मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:23 PM2022-08-29T18:23:24+5:302022-08-29T18:24:09+5:30

मोर्वेकर यांच्या घरात हा स्फोट झाला होता. मोर्वेकर या ५० टक्के भाजल्या होत्या तर रियांश हा देखील २० टक्के भाजल्याने या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते

Struggle with death failed, Dombivli blast case death of old woman | मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू

मृत्युशी झूंज अपयशी, डोंबिवली स्फोट प्रकरणातील वृध्द महिलेचा मृत्यू

Next

डोंबिवली: येथील पश्चिमेकडील गायकवाडवाडी परिसरातील पारसनाथ इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात २३ ऑगस्टला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात घरातील मनीषा मोर्वेकर ( वय ६५) यांच्यासह घराजवळून जाणारे उरसुला लोढाया ( वय ४०) आणि त्यांचा मुलगा रियांश ( वय ५) असे तीघे जखमी झाले होते. दरम्यान यातील मनिषा मोर्वेकर यांची सहा दिवस मृत्यूशी चाललेली झुंज आज संपली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोर्वेकर यांच्या घरात हा स्फोट झाला होता. मोर्वेकर या ५० टक्के भाजल्या होत्या तर रियांश हा देखील २० टक्के भाजल्याने या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मोर्वेकर यांच्यासह रियांश याचीही प्रकृती गंभीर बनली होती. रियांशच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रविवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची आणि आई उरसुल्ला या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहीती रूग्णालय सूत्रांनी दिली. दरम्यान मोर्वेकर यांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने गायकवाडवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
 

Web Title: Struggle with death failed, Dombivli blast case death of old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.