गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ...

By अनिकेत घमंडी | Published: July 4, 2024 04:18 PM2024-07-04T16:18:12+5:302024-07-04T16:19:30+5:30

डोंबिवली येथील लोकमान्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो.

students of dombivli lokmanya gurukul experience the joy of cultivation | गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ...

गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ...

अनिकेत घमंडी,डोंबिवली: डोंबिवली येथील लोकमान्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी विविध ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. शेतकरी कसे कष्ट करतात?  याचा प्रत्यक्ष अनुभव  विद्यार्थ्यांना यावा म्हणून त्यांना भाताच्या शेतीमध्ये भाताची लागवड करण्यासाठी नेले जाते.

याही वर्षी विद्यार्थ्यांना दावडी येथे भातशेती दाखवण्यासाठी व भात लागवड करण्यासाठी गुरुवारी नेण्यात आले होते. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपण सर्व शहरी संस्कृतीत वाढत असल्यामुळे शेतीपासून दूर जात आहोत. विद्यार्थ्यांना शेती म्हणजे काय? शेतात शेतकऱ्यांना  किती काम करावे लागते? शेतकरी किती मेहनत घेतात? ऊन, वारा, पाऊस यामध्ये सुद्धा भात शेतीत चिखल किती असावा लागतो? भातशेतीला पाणी किती लागते? चिखलाने हात पाय कपडे माखताता याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी भाताची लागवड करून घेतला.

आवणीतून किंवा वाफ्यातून भाताची रोपे काढून दुसरीकडे लावण्याचा अनुभव या क्षेत्रभेटीत विद्यार्थांना देण्यात आला. या भात शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये विद्यार्थिनींनी नांगरही धरला होता.अश्या पद्धतीने चिखलात मनसोक्त उड्या मारत भात लागवड करण्याचा अनुभव या क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी घेतला. ही भाताची शेती लोकमान्य गुरुकुलाचे शिक्षक  मंगेश गायकर यांची आहे.

विद्यार्थ्यांसोबत त्यांचे वर्गशिक्षक म्हणजे  राजश्री बडवे, सायली फणसे, व्यंकटेश प्रभुदेसाई, सारिका लोखंडे,  भरत साळवी ,विजय दीक्षित व  मंगेश गायकर इत्यादी शिक्षकांनी भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव शेतात काम करून घेतला.

Web Title: students of dombivli lokmanya gurukul experience the joy of cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.