केडीएमसीच्या क्रीडा-सांस्कृतिक विभागातर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला शुभारंभ

By मुरलीधर भवार | Published: July 3, 2024 06:18 PM2024-07-03T18:18:58+5:302024-07-03T18:20:13+5:30

स्पर्धा ६ जुलैपर्यंत चालणार, ५८ संघ सहभागी

Subroto Mukerjee Football Cup was launched by KDMC Sports-Cultural Department | केडीएमसीच्या क्रीडा-सांस्कृतिक विभागातर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला शुभारंभ

केडीएमसीच्या क्रीडा-सांस्कृतिक विभागातर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला शुभारंभ

मुरलीधर भवार, कल्याण: क्रीडा-युवक सेवा संचालनालय, ठाणे जिल्हा क्रीडा परिषद आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२४-२५ सब ज्युनिअर, ज्युनिअरस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३ जुलैपासूनशहाड पश्चिम येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानावर करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे अतिरिक्त आयुक्त धैर्यशील जाधव यांचे हस्ते करण्यात आला.

ही स्पर्धा ६ जुलैपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत एकूण ५८ संघ सहभागी होत आहेत.आजचा पहिला सामना सेंट्रल रेल्वे कल्याण विरुध्द सेंट मेरी हायस्कुल चक्की नाका मुलींचा संघ यामध्ये खेळविण्यात आला. या सामन्यामध्ये सेंट मेरी हायस्कुल या संघाने विजय मिळविला. आज दिवसभरात एकुण १२ सामने खेळविले जाणार आहेत. आजच्या शुभारंभाच्या सामन्या समयी अतिरिक्त आयुक्त रोडे आणि जाधव यांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन दिले. क्रीडा- सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, पर्यवेक्षक प्रविण कांबळे, कृष्णा बनगर, क्रीष्णा माळी, दशरथ भांडे, अविनाश ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Subroto Mukerjee Football Cup was launched by KDMC Sports-Cultural Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.