Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 06:49 PM2024-09-23T18:49:51+5:302024-09-23T18:51:22+5:30

Badlapur Case Accused Akshay Shinde Suicide Attempt: ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारच्या पोलिसाची बंदूक घेऊन केला प्रयत्न

Suicide attempt of main accused Akshay Shinde in Badlapur case while transit remand Critical condition | Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Badlapur Case Accused Akshay Shinde Suicide Attempt: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.   पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात आरोपी अक्षय शिंदे आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे. या वेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले असल्याची माहिती आहे. तसेच अक्षयची प्रकृतीही गंभीर आहे.

शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने नुकतीच पोलिसांकडे दिली होती. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला होता. बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली होती. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले होते. 

Web Title: Suicide attempt of main accused Akshay Shinde in Badlapur case while transit remand Critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.